मुखपृष्ट  |  लॉगीन  | अभिप्राय  |  संपर्क

|| आध्यत्मिक विश्वातील एक दैदिप्यमान रत्न |||| श्री ||

ॐ गुरु श्रीगुरु गजानन सदगुरू |
सच्चिदानंद गुरु सच्चिदानंद ||

सदगुरु संत शिरोमणी श्री.संत गजानन महाराज यांच्या वास्तव्याने वर्‍हाड प्रांतात भक्तीचा मळा फुलवला गेला. सदगुरुंच्या कृपाप्रसादाने अनेक भक्त संतत्व पदाला पोहचले. 'आपणा जैसे करिती तात्काळ 'या उक्ति प्रमाणे खर्या भक्ताला सदगुरुंनी मुमुक्षू अवस्थेत नेले. त्याच भूमीतले एक तेजस्वी रत्न 'संत गुरु कलामाई ''.

विदर्भातील अकोला जिल्ह्यातील अकोट गावातील कुटासा या ग्रामी आपल्या तेजाने त्या काळातील लोकांना आध्यात्मिक क्षेत्रात दिपवून टाकणारे हे तेजपुंज व्यक्तिमत्व. हे तेज आजही जगाच्या दृष्टीने झाकलेले. प्रकाशात न आलेली ही आध्यात्मिक क्षेत्रातील अधिकारी व्यक्ती. सकल संताचे मुकूटमणी संत श्री. गजानन महाराज यांचा प्रत्यक्ष अनुग्रह कलामाईंना झाला होता.

स्त्रियांचे आध्यात्मिक क्षेत्रातील योगदान फार पूर्वीपासून आपल्या या भारतवर्षातील लोकांना लाभले आहे. सीतेच्या परंपरेचे अभिदान भारतभूमध्ये आहेच. त्याचप्रमाणे कुटासा गावात ही 'सीता 'त्या काळातील सर्व समाजामध्ये अत्यंत साधेपणाने राहून 'स्व 'ची ओळख जगाला दाखवन्यापेक्षा

तू मन हे मीची करी '

माझ्या भजनी प्रेम धरी|

|| सर्वत्र नमस्कारी मज ऐकाते ||

या ज्ञानेश्वरीच्या ओवीच्या अनुभूतित आनंद लुटत असे.

कुटासा या छोट्या गावात सुलतानसिंग डाबेराव यांच्या कुटूंबात ६ जून १९१६ रोजी झाला. डाबेराव यांच्या कुटुंबाची परिस्थिति अतिशय गरीब होती. शेतात जाऊन मजूरी करणे व त्यावर उदारनिर्वाह करणे हेच त्यांचे उदरभरणाचे साधन होते. संत कालामाईंची बालपाणापासून वृत्ति सात्विक होती. त्यांचा पिंड आध्यात्मिक होता.

संत कलामाई साध्वी होत्या. त्यांचे आचरण शुद्ध होते. रोज सकाळी ब्राम्हमुहुर्तावर उठून कुटासा या गावातून कित्येक मैल चालत येउन कपिलेश्वर येथील पूर्णा नदीत जाउन स्नान करीत. सर्व संतांचा भगवंत पंढरपूरच्या पांडुरंगाची त्या उपासना करीत श्री संत गजानन महाराज त्यांचे दैवत होते. त्यांचे शालेय शिक्षण झालेले नव्हते. रामूभैय्या या सदगृहस्थाने त्यांना बाराखडी शिकविली होती. कलामाई ज्ञानेश्वरी या ग्रंथाचे वाचन करीत. मंदिरात ज्ञानेश्वरीचे वाचन शुद्ध स्वरूपात व हृदयापासून केल्याने श्रोत्रुवर्गाच्या मनात भक्तीची फुले फुलत असत.

संत कलामाई श्री. दासगणूलिखित श्री . गजाननमहाराजांची श्री . गजाननविजय पोथीचे रोज पठण करीत यातूनच. महाराजांच्या चरणाशी जाण्याचा मार्ग पांडुरंगानेच त्यांना दाखविला होता. बालपणीच विवाह बंधनातून मुक्त होउन साध्वी स्त्री म्हणून परमेश्वराच्या उपासक बनल्या

वारकरी संप्रदायाचा भर स्वच्छ जीवन , निर्मल, निष्पाप व .शुचिभूर्त मन यावरच असतो. आणि तुकारामांच्या उक्तिप्रमाणे

हरिनामात रंगतो ; तोच खरा ब्राम्हण |

उत्तम त्या याति | देवा शरण अनन्यगार्त

यातायाती धर्म नाही विष्णुदासा ||

याप्रमाणेच संत कलामाईंचे जीवन होते. अध्यात्मिक मार्गातील आधिकारी व्यक्ति अतिशय निग्रही व कष्टाळू असतात. त्याचप्रमाणे कलामाईदेखिल होत्या. त्या ध्यान धारणेला बसल्या की दिवस न दिवस परमेश्वराच्या चैतन्य दर्शनाचा आनंद लुटत असत . कलामाई योग समाधी लावतात.

कल्लोळ कंचुक न फेडिता उघडे उदक |

तेवीं जगेसी सम्यक स्वरुप नो ||

याचा अनुभव त्या घेत असत संत कलामाईचे बोलणे अगदी मोजकेच असे त्या अतिशय कमी बोलत . मौन पाळत चातुर्मासत त्या व्रतस्त असत त्या पायात पदत्राणे घालत नसत.

अनेक दिवस कलामाईंनी निराहार उपवास केला होता . या उपवासाच्या कालावधीत फ़क्त रोज ९ ग्लास ढूध पीत असत .वारकरी संप्रदायातील विठ्ठलाच्या भक्तांबरोबर त्या पंढरपूर येथे वारीस जात असत . या निराहार उपोषणाच्या व्रताची पंढरपूरच्या वास्तव्यात एक संताच्या आग्रहवरून त्यानी सांगता केली.

गुरु कलामाईचे शब्द म्हणजे ब्रम्हशब्द असत त्या जे बोलत ते कदापिही असत्य होत नसे. आपल्या भागिनिसोबत आणि मातोश्रींसोबत त्या कट्यार येथे राहण्यास गेल्या . त्या वास्तव्यात कट्यार येथील कटेश्वराची नित्य पूजा करीत असत . ज्ञानेश्वरीचे वाचन करण्यासाठी कलामाई मंदिरात जात त्यावेळी देवाजवळील दिवे आपोआप प्रज्वलीत होत असत . कलामाईंचे शिष्य शंकरराव व अनेक ग्रामस्थांनी त्यांचा हा दृष्टांत प्रत्यक्ष अनुभवला आहे .'अहं ब्रम्हासी ' या अवस्थेतच त्या सतत असत . परमेश्वराचे भजन , चिंतन , करून त्यांनी हा कृपाप्रसाद प्राप्त करून घेतला होता . कलामाई परमेश्वराची आरती करत असताना सर्व भक्तगणांना मोठा भक्तिउत्सव वाटत असे . कारण आर्त स्वराने परमेश्वराची स्तुती बाईंनी केल्यावर प्रत्यक्ष परमेश्वर [ श्री संत गजानन महाराज ] भक्तासाठी धावून येत असत . या भक्तिसोह्ळयाची अनुभूति मिळालेले सर्व भक्तांचेही केवढे थोर भाग्य !

कार्तिक महिन्यात कंटेश्वराची काकड़ आरती त्या करीत असत एकदा अशीच आर्त स्वराने कंटेश्वराची आरती करीत असताना एक मोठा नाग पिंडीवर येऊन फणा काढून बसला होता . तो नाग डोलू लागला आणि त्याचबरोबर कलामाई सोबत असलेले रामचंद्र सोळंके यांनी कलामाईंना नागाबद्दल सांगताच त्या म्हणाल्या की, तुमच्यामुळे मलाही दर्शन झाले . केवेढी ही नम्रता अन् अहंकारशून्य अवस्था.

संत गुरु कलामाई यांच्या आध्यात्मिक प्रगतीस सदगुरु गजानन महाराज यांनी अनुग्रह देऊन चैतन्यरूपासी नेले कलामाई शांत व शुद्ध अंतकरणाच्या असल्याने वारकर्‍यांना प्रेमाने स्वतः जात्यावर धान्य दळून त्या पीठाची भाकरी वाढत असत . श्री संत ज्ञानेश्वर महाराजांनी समाधी घेतल्यानंतर स्वतः श्री गुलाबराव महाराजांनी अनुग्रह दिला त्याचप्रमाणे श्री संत गजानन महाराजांनी समाधी घेतल्यानंतर कलामाई यांना अनुग्रह देऊन सज्ञान केले काही क्षणातच महाराजांच्या दर्शनाने व अनुग्रहाने त्यांच्या जीवनातील गुरुंची उणीव भरून आली .

संत उपकारा, कोणती उपमा | जन्ममृत्यू भ्रमा संहारिती |

संत गुरु केवळ कृपेचे दातार | चाले बोली इश्वर त्यांच्या रूपे |

भार्गव संतांच्या , चरणांचा दास | आत्मा उद्धारास याच देही |

[ कैवल्याचे धाम ]

सदगुरु गजानन महाराजांच्या दर्शनास कलामाई शेगावी जात असत . भक्त व भगवंताचे असे हे अतूट नाते होते . संत गुरु कलामाई यांनी श्री शंकरराव ओसवाल याना अनुग्रह देऊन आपल्याकडील उर्जेचे संक्रमण केले .

श्री . क्षेत्र कट्यार येथे कलामाई यांचा आध्यात्मिक शक्तीचे अनेक अनुभव लोकांना आले . गुरु कलामाई व शिष्य शंकरराव या गुरु शिष्यांनी आसपासचा परिसर भक्तिमार्गाने सुगंधीत केला होता .

श्री संत गजानन महाराजांचा ज्यांना प्रत्यक्ष अनुग्रह लाभला ,अशा कलामाईंनी त्यांचे शिष्य श्री. शंकरराव यांना सांगितले की, आजपासून २५ वर्षांनी तुम्हाला उजव्या हातावर गणपती डाव्या पायावर ॐ चिन्ह, तळहातावर पदमचिन्ह, पिंड इ चिन्हे असलेल्या व्यक्तीसहे उर्जा व् ज्ञान द्यावे त्याप्रमाणे श्री. शंकरराव गुरु माउलींच्या संकेतानुसार 'येवदा' या गावी आले तेथे श्री दासभार्गव यांचा ३ दिवस त्यांनी शोध घेतला. श्री शंकरराव व दासभार्गव यांची भेट झाली . आणि हा अमोल आध्यात्मिक वारसा श्री . दासभार्गवांकड़े संक्रमित झाला .

वर्‍हाड प्रांतातील मुंगसाजी बाबांप्रमाणे आपणासही संजीवन समाधी मिळावी अशी कलामाईंची इछा होती. सदगुरु गजानन महाराजांसारखे गुरु असताना कलामाईंची ही इछा पूर्णत्वाला जाणे अशक्य नव्हतेच .

दिनांक ४ एप्रिल १९५६ चैत्र मास, शुक्रवार, विलंबी नाम संवत्सर, उत्तरायण, वसंतऋतू हस्त नक्षत्र व ध्रुव योग या दिवशी श्री क्षेत्र कट्यार येथे कटेश्वराच्या मंदिराजवळ असलेल्या तुळशी वृंदावनाजवल प्रथम बाईंची पूजा केली. अन् तत्क्षणी बाईंची समाधी लागली . त्यांच्याजवळ त्यांचे ग्रंथ ज्ञानेश्वरी व श्री गजानन विजय हे हे ठेवले होते .

सकाळी ९ वाजता ध्यानस्थ असलेल्या गुरुमाईंची आरती सर्व भक्तांनीकेली . भरपूर जनसमुदाय जमला होता ध्यानस्थ अवस्थेत असलेल्या या गुरुमाउलीची मिरवणूक काढण्यात आली . सर्व भक्तांनी या गुरुमाउलींवर आपली भक्तिरूपी पुष्पे उधळली. संध्याकाळी ६ वाजता पूर्णा नदीच्या काठावर आपले चैतन्यमयी रूप संजीवन अवस्थेत ठेवून या साध्वी माउलीने श्री क्षेत्र कट्यार गजनानमय करून श्री . गजानन ज्योतित स्वताला विलीन करून घेतले .

श्री क्षेत्र कट्यार गुरु माउलींच्या अध्यात्मिक तेजाने उजळून निघाले . या संत गुरु कलामाईंचे अध्यात्मिक वारसदार श्री दासभार्गव विनम्रतेने सर्व भक्तपरिवारास सांगतात

सेवा भावे जावे संताचे निकट

उद्धाराचा मार्ग चोखट दुजा नाही ||१||

वासना सांडूनी व्हावे निविॅक्ल्प

'करवा मनी संकल्प परमार्थ्रे ||२||

सेवावे नामसुख अनुसंधाने

श्रवण भजन कीर्तन घ्यावी गोडी ||३||

संतचरणावरी घ्यावे लोटांगण

तेथे सारेची देवगण विराजिती ||४||

संतकृपे दासभार्गव पोशिला

कलामाईंने वारसा दिला अनुग्रहे ||५||

|| श्री गजानन | जय गजानन ||