मुखपृष्ट  |  लॉगीन  | अभिप्राय  |  संपर्क

|| गजानन भक्तीचे अग्रदूत - श्री दासभार्गव ||ॐ गुरु श्रीगुरु गजानन सदगुरू |
सच्चिदानंद गुरु सच्चिदानंद ||

सप्तर्षीच्या या पवित्र भूमीत दि. २३/०२/१८७८ रोजी शेगावी एक परब्रम्ह अवतरले. ३२ वर्षाच्या प्रदीर्घ कालखंडात या भृगुब्रम्हा ऋषिश्वराने अनेक अवतार लीला केल्या. या ऋषिश्वराच्या उर्जेची आजही आपल्या सर्व भक्ताना अनुभूती येते. ही उर्जा प्रेरित करणारे अनेक संत या भूमीत कार्य करीत आहेत.

आपला प्रत्येक श्वास हा सदगुरुंच्या सेवेत वेचणारे श्री. दासभार्गव संतगुरु कलामाईंचा वारसा चालवत आहेत. संतगुरु कलामाई यांना सदगुरु श्री. गजानन महाराज यानी संजीवन समाधी घेतल्यानंतर प्रत्यक्ष अनुग्रह दिला होता .त्यांचा वारसा त्यांनी संत श्री शंकरराव यांना दिला श्री शंकरराव यांनी हा वारसा श्री दासभार्गव यांच्याकड़े संक्रमित केला आहे.

गुरु शिष्य परंपरा हीच भारतीय संस्कृतीची खास ओळख आहे. या परंपरेचे जतन अर्थातच श्री. दासभार्गव यांच्याकडूनही अत्यंत उदात्त स्वरूपात होत आहे. भारतीय संस्कृतीतील उच्चतम अध्यात्मिक गोष्ट म्हणजे प्रत्यक्ष परब्रम्हाचे दर्शन ध्यानमार्गातुन या परब्रम्हाचे दर्शन घडून सत् - चित - आनंदात रममाण होणे ही अत्यंत दुर्लभ कठीण गोष्ट श्री दासभार्गवानी स्वतः साधली आणि अनेक भक्ताना त्याची प्रत्यक्ष अनुभूती मिळवून दिली.

श्री दासभार्गावांच्यासारखा शुद्ध ह्रदय असलेला आत्मा अर्थातच पुण्यात्मा सदगुरुनीच निवडून सदगुरुंचे कार्य करण्यासाठी प्रेरित केला श्री दास भार्गव हठयोगी असल्यानेच आशा प्रकारचे कठीण कार्य पूर्णत्वाला नेऊ शकतात.

अहं गेला तूजे पायी | देहादेही देवकला ||

भार्गे हाच योगभक्ति | सर्वाभूती , गजानना ||

संदर्भ :- [ कैवाल्याचे धाम अभंग क्र २८ ]

श्री दासभार्गावांची सेवा म्हणजे निष्काम सेवा संत तुकरामानसारखे त्यांचे जीवन भौतिक सुखातुन मनाला लांब ठेवून मानवी जीवनाचे खरे उद्दिष्ट साधन्यासाठी केलेल्या प्रयत्नानांणा सदगुरुंचा कृपा आशीर्वाद लाभला . श्री दासभार्गावना अनेक संतानी त्यांच्याच हृदयातील अध्यात्मिक ज्योतीचा प्रकाश दाखविला.

सदगुरु श्री गजानन महाराजानी " माझे सुदामे काय वार्र्यावर सोडतोस असा संकेत दिला व त्यानुसार आजपर्यंत सदगुरुंच्या अप्रकाशित राहिलेल्या लीला शोधून काढण्याचे कठीण कार्य सतत १२ वर्ष संशोधन करून घेतले. श्री गजानन चरित्रकोश लेखन म्हणजे श्री दासभार्गावांच्या ह्रुदयातील सदगुरु विषयीच्या भक्तीचे , प्रेमाचे व निष्ठेचे यथार्थ दर्शन होय. चरित्रकोश लेखन शास्त्रशुद्ध , सत्य व अध्यात्मिक पातळिवर उच्चस्तरावर विराजमान झालेले आहे. श्री च्या सर्व भक्तांनी हे सत्य मान्य केलेले आहे .

श्री दासभार्गव सतत नामस्मरनात तल्लीन असतात.

नाम कोणत्याही देवाचे , प्रेम धरा हृदयी |

निष्ठा असावी पायी सदगुरुचिया ||

[ संदर्भ, कैवल्याचे धाम अं. क्र ३६ ]

नामस्मरनात सतत निजानंदी तल्लीन राहणारे श्री दासभार्गव भक्तिमार्गातुन सदगुरुंच्या चरणी लीन होतात

धन, मान, वित्त, तूच माझे सर्व |

भक्तिचाही गर्व देऊ नको

[ संदर्भ कैवल्याचे धाम अं क्र ८२ ]

सदगुरुंवरील त्यांच्या ह्रुदयातील प्रेम वाणीतून कसे बाहेर पड़ते याचे उत्तम उदहारण म्हणजे त्यांनी लिहलेल्या विविध, अभंगाची रचना , भावतरंग गजनानाचिये द्वारी कैवल्याचे धाम या त्यांच्या सदगुरुंवरील काव्यात्मक रचना म्हणजे भक्तिरसाची सर्वोत्तम कलाकृति हे अभंग त्यांच्याकडून लिहून घेतानाच त्या अभंगाची धुंद सदगुरू त्यांना देतात संगीतानेच अध्यात्माची ले जोडली जाते हे प्राचीन काळापासुनचे सत्य दासभार्गावांच्या कार्यरुपाने आम्ही अनुभवतो .

श्री गजानन चरित्रकोश व सदगुरुंच्या काव्यात्मक कलाकृतीतून सदगुरुंच्या भक्तांनी या भक्तिरसाचा आनंद लुटावा अन आजही सदगुरुंच्या उर्जेची अनुभूति मिळावी यासाठी श्री दासभार्गव यांच्या आध्यात्मिक उर्जेच्या प्रकाशकिरणांचा लाभ घेवून आपले जीवन प्रकाशमान करावे हीच सदगुरुंच्या परिवारातील भक्तांकडून बहुमूल्य भेट होय. श्री दासभार्गव यांच्याच शब्दात सांगायचे म्हणजे .....

माझा सर्वे सर्वा , गुरु गजानन |

केले समर्पण , येथासांग ||

|| श्री गजानन , जय गजानन ||

[ संदर्भ कैवल्याचे धाम. अं. क्र. ४४ ]

पुढे